सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत राहत असते. अशातच आता जेवणामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विद्यापीठातील कॅन्टीनच्या जेवणात अळ्या आढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , हा प्रकार २२ जुलै रोजी उघडकीस आला होता. जेवणात अळ्या सापडण्याचे प्रकार वारंवार घडत असून विद्यापीठ प्रशासन याकडे दुर्लक्ष करते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय.
जेवणात अळ्या आढळून आल्याचा फोटो विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. निकृष्ट पद्धतीचे जेवण मिळत असल्यानं विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केलीय.
काही दिवासापूर्वी विद्यापीठाच्या वस्तीगृहात उंदरांचा आणि ढेकणांचा सुळसुळाट असल्याचं समोर आलं आलं होतं. आता पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ भोजन व्यवस्था आणि स्वच्छतेच्या कारणामुळे चर्चेत आले आहे.