झोमॅटोचा ग्राहकांना मोठा झटका; 'ही' सेवा केली बंद
झोमॅटोचा ग्राहकांना मोठा झटका; 'ही' सेवा केली बंद
img
Dipali Ghadwaje
झोमॅटो ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. प्रसिद्ध ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato वरून जेवण ऑर्डर करणं आता महागले आहे. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्म शुल्कामध्ये २५ टक्क्यांनी वाढ करत ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. एवढच नव्हे तर झोमॅटोने आपली इंटरसिटी लीजेंड्स सेवाही बंद केली आहे. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी Zomato ने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे झोमॅटोच्या ग्राहकांना मोठा दणका बसला आहे.

त्यामुळे यापुढे आता झोमॅटो ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवर पाच रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. झोमॅटोने ऑगस्ट २०२३ मध्ये प्लॅटफॉर्म फी २ रुपये आकारण्यास सुरूवात केली होती. कंपनीने नफा वाढवण्यासाठी आणि नफा मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यानंतर कंपनीने दोनदा प्लॅटफॉर्म शुल्क वाढवले होते.

झोमॅटोने ३१ डिसेंबर रोजी प्लॅटफॉर्म शुल्क तात्पुरते ९ रुपये केले होते. परंतु आता आपल्याला प्रत्येक ऑर्डरवर ५ रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. जानेवारीमध्ये शुल्क वाढल्यानंतर झोमॅटोच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. प्लॅटफॉर्म शुल्क वाढल्यामुळे डिलिव्हरी चार्जेसवरील जीएसटीही वाढेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

झोमॅटो दरवर्षी सुमारे ८५ ते ९० कोटी ऑर्डर वितरित करते. प्लॅटफॉर्म शुल्कात एक रुपयाची वाढ केल्याने कंपनीला ८५ ते ९० कोटी रुपये अतिरिक्त मिळतील. मात्र, वाढलेले शुल्क सध्या ठरावीक शहरांमध्येच लागू करण्यात आले आहे. कंपनीने आपली इंटरसिटी लीजेंड्स सेवा बंद करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

या अंतर्गत कंपनी मोठ्या शहरांमधील टॉप रेस्टॉरंटमधून इतर शहरांमध्ये खाद्यपदार्थ पोहोचवत होती. लीजेंड्स टॅब आता झोमॅटोच्या ॲपवर काम करत नाही. परंतु सध्या ही सेवा थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कंपनीच्या वेबसाईटवरवर क्लिक केल्यावर लीजेड्स सेवा तात्पुरती स्थगित केल्याची माहिती मिळत आहे.

 

 
zomato | food | fees | hike |
इतर बातम्या
Join Whatsapp Group