झोमॅटोचे सीईओ दिपींदर गोयल दुसऱ्यांदा लग्नबंधनात
झोमॅटोचे सीईओ दिपींदर गोयल दुसऱ्यांदा लग्नबंधनात
img
Dipali Ghadwaje
ऑनलाइन फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोचे सह-संस्थापक आणि सीईओ दिपींदर गोयल यांनी नुकतेच दुसरं लग्न केल्याची माहिती आहे. मेक्सिकन मॉडेल ग्रेशिया मुनोजसोबत ते लग्न बंधनात अडकले आहे. एका वृत्त संस्थेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. गोयल यांचं हे दुसरे लग्न असल्याचं बोललं जात आहे. त्यांचं पहिले लग्न आयआयटी-दिल्ली मधील त्यांची वर्गमैत्रिण कांचन जोशी यांच्याशी झालं होतं.
 
कोण आहे ग्रासिया मुनोज?
ग्रेशिया मुनोज ही मेक्सिकोमध्ये जन्मलेली मॉडेल आहे आणि टेलिव्हिजन होस्ट देखील आहे. ती २०२२ मध्ये अमेरिकेतील मेट्रोपॉलिटन फॅशन वीकची विजेती ठरली आहे. सध्या भारतात असल्याची माहिती तीने इंस्टाग्रामवर दिली आहे. जानेवारी महिन्यातही भारतातील अनेक फोटो शेअर केले होते. त्यामध्ये दिल्लीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळांची छायाचित्रे होती. ती सध्या भारतात आपल्या घरी असल्याचं इंस्टाग्रामवरील बायोमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

दिपींदर गोयल हे 41 वर्षांचे असून नवीन पिढीतील आघाडीच्या भारतीय उद्योजकांमध्ये त्यांची गणना होते. 2008 त्यांनी मध्ये त्यांनी ऑनलाइन फूड डिलिव्हरी फर्म Zomato ची सुरुवात केली. त्यापूर्वी गोयल हे बेन अँड कंपनीत काम करत होते. Zomato ही स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध कंपनी आहे. बाजारानुसार कंपनीचे मूल्य सध्या दीड लाख कोटी रुपये आहे. अशा प्रकारे, Zomato ची गणना प्रमुख भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये केली जाते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group