सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंजली चक्र आणि सुफी मलिक यांनी 2019 मध्ये आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. तब्बल 5 वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत असताना गेल्या वर्षी त्यांनी साखरपुडा केला होता. मात्र आता पाकिस्तानी आणि भारतीय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर सुफी मलिक आणि अंजली चक्र या लेस्बियन जोडप्याने ब्रेकअपची घोषणा केली आहे.
सुफीने न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगजवळ अंजलीला लग्नासाठी मागणी घातली होती. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. अंजलीने सुफीने विश्वासघात केल्याचा आरोप करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं की, मी सुफीसोबतचं लग्न आणि नातं संपवतेय. पण तरीदेखील कोणीही वाईट बोलू नये, असंही तिने यात लिहिलंय.
दुसरीकडे सुफीने काही आठवड्यांपूर्वीच आपली चूक इन्स्टाग्रामवर कबूल केली होती. त्यात तिने लिहिलं होतं की, लग्नाला काही दिवस असताना मी ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करते त्याला दुखावलंय.
अंजली न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वेडिंग प्लानिंगचं काम पाहते. तर सुफी ही लाइफस्टाइल आणि ट्रॅव्हल कंटेट क्रिएटर आहे. या घटनेनंतर या दोघींनी ऑनलाइन लग्नाची रजिस्ट्री देखील रद्द केलंय. या दोघींना इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन आपल्या नातं संपल्याच जाहीर केलंय.
या दोघींची प्रेम काहणी कॅलिफोर्नियात टम्बलरवर झाली. एकमेकांचा ब्लॉगला फॉलो करण्यापासून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. त्यानंतर सहवासातून त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.