ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तावर दुसरा हल्ला ; पाकिस्तानी सैन्याची गाडी आईडी ब्लास्टने उडवली
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तावर दुसरा हल्ला ; पाकिस्तानी सैन्याची गाडी आईडी ब्लास्टने उडवली
img
Dipali Ghadwaje
भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली, दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला २४ तासात आणखी एक हादरा बसलाय.

पाकड्यांच्या सैनिकांना बलुच लिबरेशन आर्मीने हिसका दाखवलाय. ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्यातून बाहेर येण्याच्या आतच बलुच आर्मीने आणखी एक हादरला दिला. पाकिस्तानी सैन्याची गाडी आईडी ब्लास्टने उडवली.

मिळालेल्या माहितीनुसार , या हल्ल्यात पाकिस्तानच्या १४ सैन्यांच्या चिंधड्या झाल्या. बलुच आर्मीने पाकिस्तान आणि चीन या दोघांना इशारा दिलाय. बलुचिस्थान सोडा, अन्यथा आणखी असेच मोठे हल्ले होतील. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने दोन स्वतंत्र हल्ल्यांमध्ये १४ पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. हे हल्ले बोलन आणि केच जिल्ह्यांत झाले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानातील अस्थिरता पुन्हा एकदा समोर आली.

बीएलएच्या विशेष टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने बोलनमधील माच परिसरात रिमोट-नियंत्रित आयईडीद्वारे लष्करी ताफ्यावर हल्ला केला. यात विशेष ऑपरेशन्स कमांडर तारिक इम्रान आणि सूबेदार उमर फारूक यांच्यासह १२ सैनिकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या हल्ल्यात केचमधील कुलाग तिग्रान येथे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडवर आयईडी हल्ला झाला, ज्यात दोन सैनिक ठार झाले. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

बीएलएचे प्रवक्ते जीयंद बलुच यांनी पाकिस्तानी लष्कराला "चिनी भांडवलावर चालणारी भाडोत्री टोळी" म्हटले आहे. बलुचिस्थान सोडा अन्यथा आणखी मोठा हल्ला केला जाईल, असा इशाराही दिला.

बलुचिस्तानातील खनिज संपत्तीचा स्थानिकांना लाभ न मिळता केंद्रीय सरकार आणि परदेशी गुंतवणूकदारांना फायदा होत असल्याचा आरोपही केला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर बीएलएच्या हल्ल्यांनी पाकिस्तानसमोरील अंतर्गत आणि बाह्य आव्हाने उभी ठाकली आहेत.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group