शस्त्रसंधी झाली असली तरी पाकिस्तानची लक्तरं आंतरराष्ट्रीय पातळीवर टांगले गेलेत. एवढंच नाही तर पाकिस्तानच्या महिला खासदारानेही संरक्षणमंत्र्याच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले आहेत. पाकच्या संरक्षण मंत्र्याचे संसदेतही नाचक्की झाली आहे. पाकिस्तानच्या संसदेत थेट रक्षामंत्र्यांनाच पाकिस्तानच्या महिला खासदार जरताज गुल यांनी झोडपलं.
जरताज गुल नेमकं काय म्हणाल्या?
भारत-पाकिस्तान तणाव वाढल्यानंतर रक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरून आपली भूमिका मांडली. मात्र हिच आसिफ यांची भूमिका जरताज गुल यांना खटकली आणि त्यांनी संसदेत त्यांचे वाभाडे काढले.
ख्वाजा आसिफ यांनी भारत-पाक तणावादरम्यान असे अनेक वेगवेगळे दावे केले. त्यामुळे खासदार गुल यांनी आसिफ यांना झापलं. मात्र गुल आणि ख्वाजा आसिफ यांच्यातील वादाच्या या पार्श्वभूमीवर पाकमध्ये कुणाचाच कुणाशी ताळमेळ नसल्याचं स्पष्ट आहे. त्याचवेळी पाकिस्तान युद्धाच्या वल्गना करतोय.
मुळात पाकिस्तान-भारत तणाव वाढल्यानंतर अनेक पाक नेत्यांनी भीती व्यक्त केली होती. काहींनी तर थेट युद्ध सुरु झाल्यास लंडनला पळून जाणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे पाकनं भारताशी एकहात करण्याआधी अंतर्गत वाद सोडवावा. इराद्यात पाक अंतर्गत वादाचं बेचिराख होऊन जाईल.