शाळकरी पोरांमध्ये गँगवॉर, हातात लोखंडी सळ्या, फायटर अन् काठ्या, कुठे घडली घटना ?
शाळकरी पोरांमध्ये गँगवॉर, हातात लोखंडी सळ्या, फायटर अन् काठ्या, कुठे घडली घटना ?
img
वैष्णवी सांगळे
हातात पुस्तक घेण्याच्या वयात शाळकरी मुलं हातात चक्क फायटर अन् काठ्या घेऊन हाणामारी करत आहे.  हे प्रकरण आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातुन.  कळंब शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या दोन गटात चांगलाच राडा पहायला मिळाला. या घटनेचा थरार व्हिडिओमध्ये कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे. 

कळंब शहरातील एका नामांकित शाळेच्या परिसरात हा प्रकार घडला. किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटातून जवळपास ३० विद्यार्थी हाणामारीत सहभागी होते. बरं हाणामारी फक्त हातापायाने नव्हती तर विद्यार्थ्यांच्या हातात चक्क लोखंडी सळ्या, फायटर आणि लाठ्या-काठ्या होत्या. एखाद्या सराईत गँगस्टरप्रमाणे हे विद्यार्थी एकमेकांवर तुटून पडत होते.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कळंब शहरात खळबळ उडाली आहे. शाळेच्या आवारात किंवा शाळेच्या बाहेर जर अशा प्रकारे जीवघेणी शस्त्रास्त्रे घेऊन विद्यार्थी फिरत असतील, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय? हा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे

दोन्ही गट आपसात भिडले असले तरी कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सुदैवाने ही हाणामारी सुरू असताना काही विद्यार्थ्यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली, यानंतर हे भांडण शांत झालं. या प्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली नाही. पण शाळेतील विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे हाणामारी केल्याने ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group