महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात झाली आहे. अशातच परीक्षेचा पहिल्याच दिवशी एक अतिशय धक्कदायक घटना समोर आलीये. परीक्षा पुढ्यात असताना चंद्रपुरात बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सदर घटना चंद्रपूर शहरातील सुमित्रनगर भागात घडलीये.अनिशा खरतड (19) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. आजोबांच्या मालकीच्या रिकाम्या फ्लॅटवर अनिशा नियमितपणे अभ्यासासाठी जात होती. काल देखील ती येथे गेली मात्र बराचवेळ झाला तरी ती घरी परतली नाही.
त्यामुळे तिच्या आईबाबांची काळजी वाढू लागली. अनिशा परत न आल्याने आईवडिलांनी फ्लॅटवर चक्कर मारली. त्यावेळी समोर दिसलेलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अनिशाने पंख्याला गळफास घेतला होता. त्याच अवस्थेत तिला पाहून आई-वडिलांवर दुख्खाचा डोंगर कोसळला. आईच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूच्या सर्व व्यक्ती तेथे धावून आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान पोलीस तपासात मयत विद्यार्थिनीच्या नोटबुकवर सॉरी असे लिहिलेले आढळले आहे. पोलिसांनी विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांची चौकशी केली. त्यावेळी ती अभ्यासात हुशार होती, असं कुटुंबीयांनी सांगितलं. मात्र तिच्यावर परिक्षेचा भरपूर तान होता. चांगले गुण मिळवण्यासाठी ती मेहनत करत होती. मात्र परीक्षेच्या तणावात होती. या तणावामुळेच विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.