महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच दहावी आणि बारावी वर्ग 2025 चा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
यंदा 30 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या असून ते निकालाच्या तारखेची आणि मार्कशीट कधी हातात येईल याची हत आहेत. यावर्षी, दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च आणि बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान घेण्यात आली.
निकाल जाहीर झाल्यानंतर, 10वी आणि बारावीचे विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in आणि https://mahresult.nic.in/ वर त्यांची प्रोव्हिजनल मार्कशीट तपासू शकतील.
कधी लागणार निकाल ?
महाराष्ट्र बोर्ड हेड मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्ड दहावी (एसएससी) निकाल आणि महाराष्ट्र बोर्ड बारावी (एचएससी) निकाल 2025 जाहीर करू शकते. आता बोर्ड लवकरच निकाल जाहीर करण्याची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर करणार आहे.
महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण आवश्यक ?
दहावीप्रमाणे, महाराष्ट्र बारावी (एचएससी) उत्तीर्ण होण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 35 % गुण मिळवावे लागतात. दोन्ही वर्गांसाठी उत्तीर्ण होण्याचे निकष सारखेच आहेत. प्रत्येक विषय १०० गुणांचा असतो, ज्यामध्ये थिरी 80 गुणांची असतो आणि प्रॅक्टिकल/इंटर्नल मूल्यांकन 20 गुणांचे असते. उत्तीर्ण होण्यासाठी 100 पैकी किमान 35 गुण आवश्यक आहेत. म्हणजेच 80 गुणांच्या थिअरी पेपरमध्ये किमान 28 गुण मिळवणे आणि प्रॅक्टिकलमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
रिझल्टनंतर काय कराल ?
निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी त्यांचे गुणपत्रक तपासावे. मूळ गुणपत्रिका काही दिवसांनी शाळेतून उपलब्ध होईल.