आर्थिकरित्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे . राज्य सरकारने मोठा निर्णय घेत वैद्यकीय शिक्षणासाठी शुल्क सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता वैद्यकीय शिक्षणात आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाठबळ मिळणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे ईडब्ल्यूएस (EWS) घटकातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांना संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतला आहे. यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान
होत होते ते आता होणार नाही. सरकारच्या या निर्णयानुसार, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम विध्यार्थ्यांना मिळते, ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालय जमा करतात त्यामुळे प्रवेशाच्या वेळी 50 टक्केच रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही.
दरम्यान , या योजनेत पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर फी बाबत असणारा पालकांवर आणि विद्यार्थ्यांवरील तणाव नाहीसा होणार आहे