दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज 29 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी च्या पुरवणी परीक्षेचे निकाल अधिकृतपणे जाहीर केले आहेत. पुरवणी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in द्वारे त्यांचे निकाल पाहता येतील.
ही पुरवणी परीक्षा जून-जुलै 2025 दरम्यान पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, लातूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या नऊ विभागीय केंद्रांमध्ये घेण्यात आली होती. या निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया न घालवता पुढील शिक्षणाची संधी मिळणार आहे.
निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा
- mahahsscboard.in, hscresult.mkcl.org किंवा sscresult.mkcl.org या संकेतस्थळांवर भेट द्या.
- “Maharashtra HSC/SSC Supplementary Result 2025” लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर व आईचे पहिले नाव टाका.
- सबमिट केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- भविष्यातील वापरासाठी निकाल डाउनलोड करून सुरक्षित ठेवा.