राज्यात एकमेव विद्यार्थिनीला १०० टक्के गुण…कोण आहे
राज्यात एकमेव विद्यार्थिनीला १०० टक्के गुण…कोण आहे "ही" विद्यार्थिनी?
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला. यात राज्यातील मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली.
छत्रपती संभाजीनगर विभागातील एका विद्यार्थिनीला १०० टक्के गुण मिळाले आहेत. १०० टक्के गुण मिळवलेली ही राज्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे.  

राज्य मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सकाळी 11 वाजता इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. त्यात राज्यातील एकमेव विद्यार्थिनीने 100 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. तनिषा सागर बोरामणीकर असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीला प्रत्यक्ष परीक्षेत ५८२ आणि क्रीडा गुण १८ असे एकूण ६०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

दरम्यान गोसावी म्हणाले, की वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनीने १०० टक्के गुण मिळवणे कौतुकास्पद आहे. खेळात केलेली मेहनत आणि अभ्यासातील सातत्य याचा परिणाम तिच्या निकालात दिसत आहे.

कोण आहे तनिषा सागर बोरामणीकर ? 

तनिषा सागर बोरामणीकर असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिला बारावीत एकूण 518 गुण मिळाले. तनिषाला बारावीतील 518 गुणांसह 18 क्रीडा गुण मिळाले आहेत. त्यामुळे ही विद्यार्थिनी 100 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. तनिषा ही राष्ट्रीय स्तरावर खेळलेली बुद्धीबळपटू आहे.

ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, पाली व अर्थशास्त्र विषयात तनिषाला शंभर पैकी 100 गुण मिळाले आहेत. तर इंग्रजी विषयात 89, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी विषयात 95 तर सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयात 98 गुण मिळाले आहेत. तनिषा बुध्दीबळ खेळाडू असून तिने आठ वर्षाखालील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच ओपन नॅशनल्स आणि राज्यस्तरीय स्पर्धेतही तिने सहभाग घेतला होता. बुद्धीबळाचा पट गाजवणाऱ्या तनिषाने बारावीच्या परीक्षेतही चमकदार कामगिरी केलीय.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group