काल दहावीचा निकाल जाहीर झाला. राज्याचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेत मुलांनी घवघवीत यश मिळवले आहेत. त्यानंतर आता अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे.
दरम्यान, काही विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत अपयश आलं आहे. त्यामुळे पुढे काय करायचे असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. दहावीतील बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेल्या मुलांना खूप टेन्शन आले असेल. परंतु तुम्ही अकरावीत प्रवेश घेऊ शकतात.
विद्यार्थ्यांच्या श्रेणीनुसार आणि गुणसुधार योजनेनुसार अकरावीत प्रवेश घेता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना सुरु केली आहे. या परीक्षेत सर्व विषयात पास झालेले विद्यार्थी त्यानंतरच्या तीन परीक्षेसाठी पात्र होऊ शकतो. फेब्रेवारी मार्चमध्ये नापास झालेला विद्यार्थी जुन जुलै २०२५ परीक्षा, फेब्रुवारी मार्च२०२६ आणि जून जुलै २०२६ यापैकी कोणत्याही एका परीक्षेसाठी तो विद्यार्थी बसू शकतो. याबाबत शरद गोसावी यांनी माहिती दिली आहे.
दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्याला अकरावीत प्रवेश
दहावीसाठी ATKT लागू केली आहे. जर एखादा विद्यार्थी एक किंवा दोन विषयात नापास झाला तरी त्याला अकरावीला प्रवेश मिळणार आहे. याला allowed to keep terms म्हणजेच एटीकेटी म्हणतात.त्यानुसार तुम्ही अकरावीत अॅडमिशन घेऊ शकतात. परंतु बारावीसाठी अॅडमिशन घेण्यापूर्वी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. दहावी पास केल्यानंतर अकरावी आणि मग नंतर बारावीची परीक्षा तुम्ही देऊ शकतात.