व्ही. एन. नाईक संस्थेसाठी
व्ही. एन. नाईक संस्थेसाठी
img
Mukund Baviskar
नाशिक, ( भ्रमर प्रतिनिधी ) : व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २७) सुमारे ८२ टक्के मतदान झाले. संस्थेच्या कार्यालयात ३५ बुथवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली हाेती. प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्हीची करडी नजर हाेती. संस्थेच्या इतिहासात प्रथमच यंदा ४ पॅनल तयार झाले हाेते. आज (दि. २८) सकाळी ७ वाजेपासून मतमाेजणीला सुरूवात हाेणार अाहे. 

यात काेंडाजीमामा आव्हाड व माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्त्वाखाली परिवर्तन पॅनल, पंढरीनाथ थाेरे व शिवाजी मानकर यांच्या नेतृत्त्वात क्रांतीवीर विकास पॅनल, तानाजी जायभावे व हेमंत धात्रक यांच्या नेतृत्त्वात प्रगती पॅनल आणि मनाेज बुरकुले आणि अभिजीत दिघोळे यांच्या नेतृत्वात नवऊर्जा पॅनलने ही निवडणूक लढविली. एकूण २९ जागांसाठी ११२ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले . मतदान केंद्रावर पाेिलसांचा चाेख बंदाेबस्त हाेता. आज (दि. २८) सकाळी ७ वाजेपासून मतमाेजणीला सुरूवात हाेणार आहे. पहिल्या टप्प्यात महिला संचालक विश्वस्त पदासाठी माेजणी करण्यात येणार आहे.

त्यानंतर इतर पदांसाठी मतमाेजणी करण्यात येईल. सायंकाळपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असा विश्वास यावेळी निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अॅड. जालिंदर ताडगे यांनी व्यक्त केला.,

एका पॅनलने भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आपल्या बाजूने असल्याचे सांगितल्या नंतर गाेंधळ उडाला हाेता. मात्र नेत्या पंकजा मुंडे यांनी एक व्हिडीओ तयार करून आपण काेणत्याच पॅनलकडून नसून सर्वच पॅनल आपले आहेत . ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडावी, असे आवाहन केले हाेते.

वाहतूक काेंडींने नागरिक त्रस्त

नाईक शिक्षण संस्थेच्या इमारतीत मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी माेठ्या प्रमाणात वाहनकाेंडीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागला. रस्त्याच्या दुतर्फा वाहनकाेंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या. परिसरात असलेल्या दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांनाही या वाहतूक काेंडीचा माेठ्या प्रमाणात फटका बसला. ग्रामीण भागातून मतदानासाठी चार चाकी वाहन घेऊन आलेले मतदार रस्त्यातच वाहन उभे करून मतदानासाठी जात असल्याने वाहतूक काेंडी साेडवताना वाहतूक पोलिसांच्या नाकी नऊ आहे हाेते.

मतदार-पोलसांत वाद

मतदानासाठी जाताना थेट मतदानाच्या ठिकाणापर्यंत चारचाकी वाहने घेऊन जाण्यासाठी अनेक मतदारांनी आग्रह धरला. मात्र पार्किंगमध्ये वाहन उभे करून मतदानासाठी जाण्याचे आवाहन पोलिसांनी मतदारांना केल्याने काही मतदारांनी वाद घातला.

मतदारांपेक्षा कार्यकर्तेच अधिक

मतदानाच्या ठिकाणी चारही पॅनलने आपले टेबल लावले हाेते. या ठिकाणी माेठ्या प्रमाणात कार्यकर्ते असल्याने मतदारांपेक्षा कार्यकर्तेच अधिक असल्याचे चित्र  हाेते. हे कार्यकर्ते येणाऱ्या मतदारांना आपल्याकडे बाेलावून मतदानासाठी विनंती करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर इतर पॅनलच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला हाेता. मात्र त्यानंतर अशा कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group