'सीआयएससीई'च्या दहावी, बारावी परीक्षांचे निकाल जाहीर....
'सीआयएससीई'च्या दहावी, बारावी परीक्षांचे निकाल जाहीर....
img
Dipali Ghadwaje
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्डाचा (सीआयएससीई) इयत्ता दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी) परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

१० आणि १२ वीच्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना CISE वेबसाइट cise.org या वेबसाईटला भेट देऊन निकाल पाहता येईल. 

बोर्डाच्या ‘https://cisce.org’ आणि ‘https://results.cisce.org’ या संकेतस्थळांवर १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येईल. या निकालाची प्रिंटआऊट देखील विद्यार्थी काढू शकतील. 


डिजीलॉकरने या संदर्भात X हँडलवर पोस्ट लिहून त्याबद्दल रविवारीच माहिती दिली होती. त्याप्रमाणे ICSE (10वी) आणि ISC (१२ वी) विद्यार्थी डिजीलॉकरवर त्यांचे अकाऊंट तयार करून त्यांचे उत्तीर्ण प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतील. विद्यार्थ्यांना जर त्यांच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करायची असेल तर सीआयएससीईच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘पब्लिक सर्व्हिसेस’ या टॅबमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल. हे अर्ज विद्यार्थ्यांना १० मे पर्यंत करता येणार आहेत, अशी माहिती बोर्डाने दिली आहे.

डिजीलॉकरवर विद्यार्थ्यांना या प्रमाणे निकाल पाहता येईल : 

सर्वात आधी DigiLocker वेबसाईट digilocker.gov.in. ला भेट द्या किंवा ॲप डाउनलोड करा. त्यानंतर, तुमचा मोबाईल नंबर वापरून DigiLocker वर तुमचे अकाऊंट तयार करा. आता तुमच्या क्रेडेन्शियल्ससह log in करा. त्यानंतर, तुमच्या मार्कशीटवर क्लिक करा आणि बोर्ड निवडा. तुमचा रोल नंबर टाईप करा आणि शैक्षणिक वर्ष निवडा. आता तुमचे ICSE, ISC बोर्डाच्या गुणाचे तपशील स्क्रीनवर दिसतील. तुम्ही तुमचा निकाल आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group