राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शालेय शिक्षकांसाठी एक अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज शालेय विद्यार्थ्यांचा चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्राचा शेवटचा पेपर आहे. चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024-25 आज संपणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा आज 25 एप्रिल 2025 रोजी समाप्त होतील आणि त्यानंतर उद्यापासून म्हणजेच 26 एप्रिल पासून शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत.
खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या कधी लागणार असा सवाल उपस्थित केला जात होता आणि यंदा उन्हाळी सुट्ट्या उशिराने का लागत आहेत यामुळे नाराजी पाहायला मिळत होती.
वाढत्या तापमानामुळे पालक चिंतेत होते मात्र आता पालकांची ही चिंता दूर होणार आहे कारण की उद्यापासून विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागणार आहेत. मात्र असे असले तरी शालेय शिक्षकांना मे महिन्यात सुद्धा शाळेत यावे लागणार आहे.
उद्यापासून शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी लागू होईल आणि शिक्षकांची उन्हाळी सुट्टी 6 मे 2025 पासून सूरु होणार आहे. दरम्यान नवीन शैक्षणिक वर्षात शाळेला कधी सुरुवात होणार, उन्हाळी सुट्ट्यानंतर शाळा कधी सुरू होणार याबाबत सुद्धा मोठी माहिती समोर येत आहे.
आज शुक्रवार चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा शाळेचा शेवटचा दिवस राहणार आहे. 26 एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या लागतील आणि 1 मे 2025 रोजी शाळांकडून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुद्धा शिक्षकांना काही दिवस शाळेत यावे लागणार आहे. खरे तर आज विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर आहे आणि त्यानंतर एक मे ला निकाल लागेल यामुळे शिक्षकांना आता या दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांचे पेपर तपासावे लागणार आहेत आणि त्यांचे प्रगतीपत्रक रेडी करायचे आहे.
यामुळे उद्यापासून शालेय शिक्षकांची मोठी धावपळ आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे एक मे रोजी विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुद्धा पुढील चार दिवस शिक्षकांना शाळेतच यावे लागणार आहे.
त्यानंतर मग 6 मे 2025 पासून शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत. शिक्षकांची उन्हाळी सुट्टी यंदा थोडी लांबली आहे, शिक्षकांची उन्हाळी सुट्टी दोन दिवस उशिराने सुरू होत आहे.
खरे तर, दरवर्षी एप्रिलचा पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा घेतली जात असते मात्र यावेळी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सत्र उरकण्याची शाळांची पद्धत बंद केली आहे.
यावेळी पहिल्यांदाच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्र परीक्षेला सुरुवात झाली आणि 25 एप्रिल 2025 पर्यंत ही अंतिम सत्र परीक्षा आयोजित करण्यात आली. आज मात्र विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा समाप्त होईल आणि उद्यापासून त्यांना सुट्टी लागेल.
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात कधी होणार ?
शालेय विद्यार्थ्यांना उद्या 26 एप्रिलपासून तर शिक्षकांना 6 मे पासून उन्हाळी सुट्या लागू होतील. दरम्यान नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून महिन्यात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-26 ला सुरुवात होईल आणि हा दिवस शाळेचा पहिला दिवस असेल.