NEET UG 2024 परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदाच्या नीट परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळतंय. अनेक आरोग्य प्रत्यारोप यावेळी बघायला मिळाले. परीक्षेला बसलेल्या 23 लाखांहून अधिक उमेदवारांचे निकाल आज पुन्हा जाहीर झाले.
18 जुलै रोजी NEET प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान मिळालेल्या सूचनांचे पालन करून NTA ने आज, 20 जुलै रोजी NEET उमेदवारांचे निकाल पुन्हा जाहीर केले आहेत. परीक्षार्थी अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET/ वर जाऊन त्यांचे सुधारित स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकतात.

40 हून अधिक याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने NTA ला NEET चे निकाल शहर आणि केंद्रानुसार पुन्हा जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आज 20 जुलै दुपारपर्यंतची मुदत दिली होती.
असे चेक करा मार्क
निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://exams.nta.ac.in/NEET/ या अधिकृत वेबसाइटवर जावे
लागेल.
सुधारित स्कोअर कार्ड पाहण्याची लिंक वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावर आहे, या लिंकवर . क्लिक केल्यानंतर "NEET 2024 सुधारित स्कोअर कार्डसाठी 'Click Here' लिंकवर करा.
आता अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि ईमेल आयडी किंवा मोबाइल क्रमांक आणि सेक्युरीटी पिन यांसारखी लॉगिन क्रेडेंशियल प्रविष्ट केल्यानंतर तुमचा निकाल दिसेल.