बारावीच्या विद्यार्थ्यांसंदर्भांत मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाने बारावीच्या परीक्षेच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. आता बारावीचा निकाल हा मंगळवारी 21 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आल्या होत्या. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तसेच शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा तब्बल नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेसेजद्वारे देखील पाहता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना MHHSC ROLL NO हा मेसेजमध्ये टाइप करून 57766 या नंबरवर पाठवावा लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या फोनवर निकाल मेसेजद्वारे मिळेल.
HSC Result l ‘या’ अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार निकाल :
– mahresult.nic.in
– http://hscresult.mkcl.org
– www.mahahsscboard.in
– https://results.digilocker.gov.in
शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या तारखेमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची प्रचंड उत्सुकता लागली आहे.