दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे आता निकाल कधी लागणार याकडे लक्ष लागले आहे. मे महिना सुरु व्हायला अवघे १५ दिवस उरले आहेत. मे महिन्यात कदाचित १२वीचा निकाल लागू शकतो, असं सांगण्यात येत आहे.
मात्र, याबाबत बोर्डाकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु दहावी-बारावीच्या निकालाची संभाव्य तारखेबाबत अपडेट आले आहे.
२०२४-२५ वर्षातील दहावी-बारावीचा निकाल हा लवकर लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी हा निकाल जून महिन्यात लागतो. परंतु यावर्षी मे महिन्यात हा निकाल लागण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १२वीचा निकाल तर त्यानंतर १० दिवसांत दहावीचा रिझल्ट लागू शकतो.
निकाल कुठे अन् कसा पहावा?
दहावी- बारावीचा निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पाहू शकणार आहे. यासाठी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा हॉल तिकिट नंबर आवश्यक आहे. हा नंबर असेल तरच तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. त्यामुळे तुमचे हॉल तिकीट शोधून ठेवा.
- सर्वप्रथम तुम्हाला mahresult.nic.in या वेबसाइटवर जायचे आहे.
- यानंतर तुम्हाला तिथे HSC Result 2025 हा ऑप्शन दिसेल.
- यानंतर तुमचा सीट नंबर टाका. नंतर आईचे अचूक नाव टाका.
- यानंतर तुम्हाला वेबसाइटवर तुमची मार्कशीट दिसेल. ही मार्कशीट तुम्ही डाउनलोड करु शकतात.
फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात बारावीच्या परीक्षा झाल्या होत्या. १५ लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. या विद्यार्थ्यांना आता निकालाचं टेन्शन आलं आहे. निकाल कधी लागणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. तर हा निकाल मे मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे.