नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वामध्ये भाजपच्या शिष्टमंडळा ने मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली . रविवारी झालेल्या या भेटीमध्ये भाजपकडून चार मागण्या आयोगा समोर मांडण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं की , आम्ही चार मागण्या निवडणूक आयोगासमोर मांडलेल्या आहेत. यामध्ये मत मोजणीच्या प्रक्रियेत प्रत्येक अधिकाऱ्याला छोट्यातली छोटी माहिती असली पाहिजे.
दुसरीकडे इंडिया आघाडीनेदेखील निवडणूक आयोगाकडे एक मागणी केली आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी याबद्दल माहिती दिली . ''मागील काही काळात आम्ही तिसऱ्यांदा निवडणूक आयोगात आलो आहोत. पोस्टल बॅलेट हे निकालात महत्वाची भूमिका बजावत असतात. पोस्टल बॅलेटची सर्वप्रथम मोजणी केली जावी , हा निवडणूक आयोगाचा नियम आहे. त्यामुळे चार तारखेला निकाला दरम्यान या मतांची आधी मोजणी केली जावी , अशी मागणी करण्यात आली .'' अशी माहिती कॉंग्रेसचे नेते अभिषेक मनूसिंघसिंवी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या भेटी नंतर पत्रकारांशी बोलताना दिली .
तसेच व्हीव्हीपॅट स्लिपसची शंभर टक्के जुळवणी करण्याची विनंती देखील काँग्रेसच्या शिष्टमंडळा कडून आयोगाला करण्यात आली असल्या चे सूत्रांनी सांगितले. आयोगाला भेटलेल्या शिष्टमंडळात भाकपचे डी . राजा , माकपचे सीतारामयेचुरी , सपाचे रा मगोपाल यादव, संजय यादव, नासिर हुसेन आदी नेत्यांचा समावेश होता .