नरेंद्र मोदी निवृत्त झाल्यावर नितीन गडकरींना पंतप्रधान बनवा ; काँग्रेस आमदाराची मागणी
नरेंद्र मोदी निवृत्त झाल्यावर नितीन गडकरींना पंतप्रधान बनवा ; काँग्रेस आमदाराची मागणी
img
Dipali Ghadwaje
आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्या निवृत्तीवरील वक्तव्यावर काँग्रेस आमदाराने हे भाष्य केलं होत. त्यानंतर आता काँग्रेसच्या एका आमदाराने नितीन गडकरी यांना पंतप्रधान करण्याची मागणी केली आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून निवृत्त झाल्यावर त्यांच्याजागी नितीन गडकरी यांना पंतप्रधान करायला हवं. नितीन गडकरी हेच पदासाठी योग्य व्यक्ती आहेत, असं काँग्रेस आमदाराने म्हटलं आहे.

७५ वर्ष पूर्ण झाल्यावर नेत्यांनी सरकारी पदावरुन निवृत्त झालं पाहिजे, असं आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. मोहन भागवत यांचं वक्तव्य नरेंद्र मोदी यांना इशारा असल्याचा काँग्रेस आमदाराने म्हटलं. दरम्यान, नरेंद्र मोदी हे याच वर्षी वयाची ७५ वर्ष पूर्ण करणार आहेत.

काँग्रेस आमदार बेलूर गोपालकृष्णा हे कर्नाटकातील सागर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. बेलूर यांनी म्हटलं की, नरेंद्र मोदी निवृत्त झाल्यानंतर नितीन गडकरी यांना पंतप्रधान करायला हवं. नितीन गडकरी हे पंतप्रधानपदासाठी पात्र आहेत'. नितीन गडकरी यांना देशातील गरीब लोकांची अधिक चिंता असल्याचंही बेलूर यांनी म्हटलं.

माध्यमांशी बोलताना काँग्रेस आमदार बेलूर गोपालकृष्ण म्हणाले की, 'भाजपने ७५ वर्ष झाल्यानंतर येदिरुप्पा यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं. त्यावेळी त्यांचे डोळे भरून आले होते. आता भाजपने आरएसएसच्या प्रमुखांचा सन्मान करायला हवा. वयानुसार निवृत्त होण्याचा फॉर्म्युला पंतप्रधानपदासाठी लागू असला पाहिजे'.

'देशात गरीबांची संख्या वाढू लागली आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत होऊ लागले आहेत. देशाची संपत्ती काही लोकांच्या हातात जाऊ लागली आहे. त्यामुळे गडकरी हेच पदासाठी योग्य आहेत. भाजपच्या हायकमांडने याबाबत विचार करायला हवा, असंही बेलूर यांनी सांगितलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group