मोठी बातमी! एमबीबीएसचा पेपर परीक्षेच्या तासभर आधीच सोशल मीडियावर ; नेमकं काय घडल?
मोठी बातमी! एमबीबीएसचा पेपर परीक्षेच्या तासभर आधीच सोशल मीडियावर ; नेमकं काय घडल?
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या MBBS या वैद्यकीय परीक्षांमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पेपर सुरू होण्याच्या काही वेळ आधी एमबीबीएस द्वितीय वर्षाचा फार्मकोलॉजी -1 या विषयाचा पेपर परीक्षेच्या तासभर आधी थेट सोशल मीडियावर लिक झाल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला फेर परीक्षेची नामुष्की ओढवली आहे.

या पेपरसाठी राज्यभरातील 50 केंद्रांवर जवळपास 7,900 विद्यार्थी परीक्षेला बसणार होते. आता त्यांना 19 डिसेंबर रोजी फेरपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. पेपर फुटीमागील कारण शोधण्यासाठी विद्यापीठाने उच्चस्तरीय तपास समिती स्थापन केली आहे. याशिवाय सायबर सेलच्या मदतीने ईमेलचा स्त्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. कुलगुरूंनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकारामुळे 2 डिसेंबरला  झालेला पेपर रद्द करण्यात आला आहे. आता या विषयाची फेरपरीक्षा 19 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे.

ऐन परीक्षेच्या दिवशी तासभर आधी MBBS परीक्षेचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यापीठाने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत अधिक कडक उपाययोजना केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group