विद्यार्थ्यांनो लक्ष द्या...! दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; बोर्डाने घेतला
विद्यार्थ्यांनो लक्ष द्या...! दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; बोर्डाने घेतला "हा" मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
बारावीच्या निकालानंतर सर्वांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. निकालाच्या तारखेसंदर्भात महाराष्ट्र बोर्डाकडून अद्याप कोणतीही अपडेट दिलेली नाही, पण दोन आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

पण त्याआधी महाराष्ट्र बोर्डाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. दहावीमध्ये पास होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

दहावीमध्ये पास झाल्यानंतर अकरावीत प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू होते. वेळेवर पाल्य आणि पालकांची गैरसोय होऊ नये म्हणून बोर्डाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अकरावीसाठीचा प्रवेश ऑनलाईन होणार आहे, बोर्डाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे.

दहावीची परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा सध्या निकालाकडे लागल्या आहेत. सध्या प्रत्येकजण कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा याचा विचार करत आहे, त्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बातमी समजली जात आहे. अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी बोर्डाकडून महत्त्वाचा माहिती देण्यात आली आहे.

यंदा इयत्ता अकरावीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पार पडणार आहे. अनधिकृत वेबसाईट वरून येणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन महाराष्ट्र बोर्ड प्रशासनाने विद्यार्थ्यांना आणि पालकांना केले आहे.

बोर्डाने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी केलेय. त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलेय की, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अनधिकृत संकेतस्थळावरून प्रसारित होणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेऊन प्रवेश घेऊ नये. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रसिद्ध होणारी माहिती हीच अधिकृत माहिती आहे.

Mahafyjcadmissions.in हे शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या प्रत्येकांनी फक्त अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा.
इतर बातम्या
Join Whatsapp Group