महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार होत्या. पण विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे अखेर आयोगाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.
गेल्या दोन आठवड्यापासून विद्यार्थी यासाठी आंदोलन करत होते. आज (१७ एप्रिल) रोजी आयोगाने परिपत्रक काढत ही घोषणा केली आहे. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत.
राज्य लोकसेवा आयोग अर्थातच एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुण्यातील हजारो आंदोलक विद्यार्थ्यांचं हे सर्वात मोठं यश मानलं जात आहे.
26 ते 28 एप्रिल दरम्यान मुख्य परीक्षा घेतल्या जाणार होत्या त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या सुधारित माहितीनुसार, आता 26, 27आणि 28 मे रोजी मुख्य परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 च्या सुधारित निकालानुसार नव्याने पात्र ठरलेल्या या 318 उमेदवारांना राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 च्या पूर्वतयारीसाठी पुरेसा अवधी मिळाला नसल्यामुळे दिनांक 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत नियोजित मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उमेदवारांकडून आयोगास निवेदने प्राप्त झाली आहेत.
उमेदवारांकडून प्राप्त निवेदने तसंच इतर सर्व बाबींचा साकल्याने विचार करून प्रस्तुत राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ सुधारित वेळापत्रकानुसार दिनांक 27, 28 व 29 मे, 2025 या कालावधीत घेण्यात येईल.