आता सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार, महाराष्ट्रात ७० हजार पदांची मेगाभरती
आता सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार, महाराष्ट्रात ७० हजार पदांची मेगाभरती
img
वैष्णवी सांगळे
सरकारी नोकरी हवी हे आजकाल प्रत्येकाचं स्वप्न आहे. त्यासाठी लाखो विद्यार्थी रात्रदिवस मेहनत घेतात. या लाखो तरुणांच्या स्वप्नांना अखेर बळ मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यात ७० हजार पदांच्या मेगाभरतीचा मार्ग मोकळा केला आहे. ही भरती नोकरी देणारी नाही तर पारदर्शकतेचा नवा अध्याय लिहिणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

या मेगाभरतीतील २०,००० पदे ही केवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरली जाणार आहेत. यात राजपत्रित आणि अराजपत्रित अशा दोन्ही श्रेणींचा समावेश असेल. या भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी नियमावलीत आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर उर्वरित जागा इतर विभागातून भरली जाणार आहे. 

दरम्यान आचारसंहितेमुळे अनेक भरती प्रक्रिया तात्पुरत्या थांबलेल्या होत्या, मात्र आता त्या जलद गतीने राबवल्या जातील, अशी माहिती आता समोर येत आहे. येत्या काही आठवड्यांत विविध विभागांच्या अधिकृत जाहिराती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता संपताच ही प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group