एमपीएससी परीक्षा अन् निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी, विद्यार्थी संभ्रमात तर शासकीय कर्मचाऱ्यांवरही पडणार अतिरिक्त भार
एमपीएससी परीक्षा अन् निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी, विद्यार्थी संभ्रमात तर शासकीय कर्मचाऱ्यांवरही पडणार अतिरिक्त भार
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अखेर काल मतदान पार पडलं. राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या २६४ अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी मतदारांचा कौल मतपेटीत कैद झाला आहे. हा निकाल आज ३ डिसेंबरला लागणार होता मात्र ही मतमोजणी २१ डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. 

नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी लांबल्याने त्याचा थेट परिणाम एमपीएससी परीक्षेवर होण्याची चिन्हे आहेत. कारण नगरपरिषद नगरपंचायतीची मतमोजणी लांबल्याने एमपीएससी परीक्षा आणि मतमोजणी एकाच दिवशी आली आहे.

सुरुवातीला ही परीक्षा ९ नोव्हेंबरला होणार होती. मात्र त्यावेळी महाराष्ट्रातील काही भागात परिस्थिती निर्माण झाल्याने ही परीक्षा पुढे ढकलत २१ डिसेंबरला घेण्यात येणार आहे. मात्र आता नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी लांबल्याने आणि हि मतमोजणी एमपीएससी परीक्षेच्या दिवशीच होणार असल्याने त्याचा अतिरिक्त ताण जिल्हा प्रशासनावर असणार आहे. 

जिल्हा पातळीवर परीक्षेचे संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाकडे असेल. मात्र मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागातील कर्मचारी सुद्धा मतमोजणीच्या कामात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे मोठा अतिरिक्त ताण एकाच वेळी प्रशासनावर पडणार आहे. त्यामुळे २१ डिसेंबरला होणाऱ्या एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब बाबत एमपीएससी नेमका काय निर्णय घेणार आहे? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group