मोठी बातमी!
मोठी बातमी! "इतक्या" पीएसआयच्या जागांसाठी भरती निघाली , MPSC कडून जाहिरात
img
Dipali Ghadwaje
एमपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी व्हायचे असे अनेकांचे स्वप्न असते. अनेक तरुण या भरतीची वाट पाहत असतात. जर तुम्हालाही एमपीएससी परीक्षा देऊन पीएसआय म्हणून काम करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी तुम्हीही या परिक्षेसाठी अर्ज करु शकतात. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत राज्यात ६१५ पदांसाठी पोलिस उपनिरिक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली सधी आहे. याबाबत एमपीएससीद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात पोलीस उपनिरिक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे.

याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक, अराजपत्रित, गट ब पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ३८,६०० ते १,२२८०० रुपये वेतन देण्यात येईल. त्यात अधिक महागाई भत्ता आणि देय इतर भत्ते देण्यात येणार आहे. यासाठी वयोमर्यादा ३५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. मागसवर्गीय उमेदवारांची वयोमर्यादा ४० वर्ष निश्चित करण्यात आली आहे.

एमपीएससी मुख्य परीक्षा ३०० गुणांसाठी घेण्यात येणार तर शारीरिक चाचणी १०० गुणांसाठी घेण्यात येणार आहे.पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे उमेदवाराला लेखी परीक्षेसाठी पात्र समजण्यात येईल.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०२४ निश्चित करण्यात आली आहे.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group