मोठी बातमी ! MPSC परीक्षा पुढे ढकलली, 'या' तारखेला होणार परीक्षा
मोठी बातमी ! MPSC परीक्षा पुढे ढकलली, 'या' तारखेला होणार परीक्षा
img
दैनिक भ्रमर
MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. विदर्भात होणाऱ्या पावसामुळे अनेकांचे नुकसान होत असताना   MPSC परीक्षा देखील होणार होती. यामुळे हजारो MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार होता. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. 

अखेर MPSC ने परीक्षा पुढे ढकलली आहे. महाराष्ट्रातील परतीच्या पावसाने निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात येत होती. दरम्यान या मागणीची पुर्तता झाली आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ ही परीक्षा २८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार होती मात्र आता ही परीक्षा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ ही २८ सप्टेंबर २०२५ रोजी नियोजित केली होती. मात्र अतिवृष्टीमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. शिवाय २६ ते २८ सप्टेंबरला हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते.

साधारणपणे जास्तीत जास्त १ ते २ आठवडे परीक्षा पुढे ढकलून पूरस्थिती पूर्वपदावर येताच परीक्षा घेण्यात यावी अशी विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात आली होती. शासनाकडून या मागणीची पूर्तता करण्यात आली आहे.

दरम्यान २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आता ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा जवळपास एक लाख ७५ हजार ५१६ विध्यार्थी देणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. ही मागणी पूर्ण केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आयोगाचे व सरकारचे आभार मानले आहेत.
MPSC |
इतर बातम्या
Join Whatsapp Group