MPSC ने घेतला ''हा'' मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा
MPSC ने घेतला ''हा'' मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा
img
दैनिक भ्रमर
आता MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे, राज्य लोकसेवा आयोगाने mpsc एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा  मिळणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाने MPSC) एमपीएससीच्या भरती वयोमर्यादेत एक वर्षाची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वयोमर्यादा उलटायच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेत यश संपादन करण्यासाठी आणखीण एक वर्ष मिळालं आहे. त्यामुळे या निर्णयाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमयदित एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने घेतला आहे. वयोमर्यादा ओलांडल्याने नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास वर्गाकरिता (मराठा समाज) २६ फेब्रुवारी २०२४ पासून १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरू असतानाच एमपीएससीने पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. त्या जाहिरातीत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय होणार?

‘एमपीएससी’च्या १ जानेवारी ते २० डिसेंबर २०२४ पर्यंत पदभरतीसाठी ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आणि ज्यांच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातींसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमयदित शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच , मराठा समाजाच्या आरक्षणाचा समावेश करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भरतीची पदसंख्या व आरक्षण नमूद करून सुधारित जाहिराती प्रसिद्धीस आयोगाला २०२४ च्या नियोजित वेळापत्रकापेक्षा विलंब झाला आहे. वयोमर्यादा ओलांडल्याने उमेदवार अर्ज करू शकत नव्हते. त्यांना या निर्णयाने दिलासा मिळणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group