आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांना राज ठाकरेंनी दिली मोठी  गुड न्यूज; अखेर ''तो'' शब्द पाळला
आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांना राज ठाकरेंनी दिली मोठी गुड न्यूज; अखेर ''तो'' शब्द पाळला
img
Nandini khandare More
सध्या राज्यात MPSC  आंदोलनावरून मोठा गदारोळ सुरु आहे.  पुण्यामध्ये MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. पेपर फुटीपासून या सर्व विषयाची सुरुवात झाली. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. महाराष्ट्रातील विविध नेते या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन आपपाली भूमिका मांडत आहेत.

दरम्यान ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती. 5 ऑक्टोंबरला राज ठाकरे तिथे गेले होते. त्यावेळी राज ठाकरेंनी MPSC विद्यार्थ्यांना आश्वसन दिलं होतं. त्याप्रमाणे राज ठाकरेंनी आपला शब्द पाळला आहे. आज राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करुन ही माहिती दिली.

“आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे” असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

इतर बातम्या
Join Whatsapp Group