MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरातील विजय लामकाने राज्यात प्रथम तर मुलींमध्ये आरती जाधव अव्वल
MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरातील विजय लामकाने राज्यात प्रथम तर मुलींमध्ये आरती जाधव अव्वल
img
वैष्णवी सांगळे
महाराष्ट्र लोकसेवा अयोगातर्फे २७ ते २९ मे, २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार विविध २० संवर्गातील एकूण ४६१ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे. या परीक्षेमध्ये सोलापूर जिल्हातील विजय नागनाथ लामकाने हे सर्वसाधारण तथा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम तर सोलापूर जिल्हातील आरती परमेश्वर जाधव या महिलांमधून राज्यात प्रथम आल्या आहेत. 

प्रस्तुत निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास, अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास तसेच शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.

उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास, अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास तसेच शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.

वैद्यकीय तपासणीस अनुपस्थित असलेले वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवारांचा अंतिम निकालात समावेश करण्यात आलेला नाही. परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या व अन्य मुदयांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.

प्रस्तुत परीक्षेकरिता मा. उच्च न्यायलय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र.१७४६/२०२६प्रकरणी दिनांक १८ फेब्रुवारी, २०२६ रोजी झालेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांचा निकालात समावेश करण्यात आला आहे. तथापि, प्रशासकीय कारणास्तव सदर उमेदवाराची शिफारस राखून ठेवण्यात आली आहे. सदर निकालानुसार दिव्यांग, अनाथ, खेळाडू, मागास इत्यादीसाठी आरक्षित पदावर शिफारसपात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group