
२९ जुलै २०२५
हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आतापर्यंत थेट प्रत्यक्ष दोन भेटी झाल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या जुलै महिन्यात पाच तारखेला मराठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ठाकरे बंधूंमध्ये पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाला. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री जात त्यांना शुभेच्छा दिल्या.
अनेक वर्षानंतर राज ठाकरे मातोश्रीवर आल्याने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले होते.
दरम्यान, राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी कधी जाणार? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे हे थेट मातोश्री येथे दाखल झाल्याचे पाहायला मिळाले होते. या भेटीनंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या भेटीचा पुढचा मुहूर्त गणेशोत्सवाचा असल्याची माहिती समोर येत आहे. येणाऱ्या गणेशोत्सवात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी जाणार असल्याची माहिती समोर आहे. २७ ऑगस्ट किंवा २८ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी जाण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.
Copyright ©2025 Bhramar