पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधून खळबळ उडविणारी बातमी समोर आली आहे. अॅटलास कॉपको ग्रुप या नामांकित आयटी कंपनीत नुकतीच नोकरीला लागलेलया एका 27 वर्षीय तरुणाने ऑफिसच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , पियूष अशोक कावडे असं या तरुणाचे नाव आहे. या घटनेने सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं ?
सकाळी कामावर हजर झालेल्या पियूषने नेहमीप्रमाणे एक महत्त्वाची मीटिंग अटेंड केली. मात्र, काही वेळाने त्याने छातीत दुखत असल्याचं सांगून मीटिंग रुममधून बाहेर पडला. यानंतर काही क्षणांतच त्याने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेतली. इतक्या उंचीवरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत पियूष मूळचा नाशिकचा असून, अवघ्या एका महिन्यापूर्वीच त्याने अॅटलास कॉपको ग्रुपमध्ये नोकरी स्वीकारली होती, अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी या आत्महत्येचा तपास सुरू केला आहे. नेमकं काय कारण घडलं की, पियूषने असं टोकाचं पाऊल उचललं? याचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला असून, सहकाऱ्यांकडूनही अधिक माहिती घेतली जात आहे.
पियूष कावडे याने आत्महत्या का केली? यामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तो आयटी इंजिनिअर असून, अवघ्या एका महिन्यापूर्वीच त्याने अॅटलास कॉपको ग्रुपमध्ये नोकरीला सुरुवात केली होती.
दरम्यान पोलिसांनी कंपनीतील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.