मागच्या तीन दिवसांपासून MPSC च्या विद्यार्थ्यांच पुण्यात आंदोलन सुरु होतं. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आहे. या आंदोलनामध्ये त्यांच्या अनेक मागण्या होत्या. त्यातील एक प्रमुख मागणी म्हणजे २५ ऑगस्टची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची होती. कारण यादिवशी एमपीएससीची परीक्षा आणि आयबीपीएसची परीक्षा दोन्ही एकाच दिवशी होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. आता आयोगाने याबद्दलचे नोटिफिकेशन काढून ही परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज सकाळी १० वाजता बैठक झाली. यामध्ये परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आयोग म्हणाले, 'आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.