दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे. त्यासाठी लागणारे हॉल तिकीट महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) जारी केले आहे. दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. त्याआधी बोर्डाने mahahsscboard.in आणि mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर हॉल तिकीट जारी केले आहेत.
हॉल तिकीट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. शाळेकडून हॉल तिकीट दिले जाणार आहे. या हॉल तिकीटावर मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का असणे आवश्यक आहे. जर सही, शिक्का नसेल तर विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही.
दहावीचे हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं?
सर्वात आधी mahahsscboard.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशनमध्ये एसएसएसी या पर्यायावर निवडायचे आहे.
यानंतर Login for Institute येईल. तिथे शाळांनी लॉग इन करायचे आहे.
यानंतर Sign in Here वर क्लिक करा.
यानंतर तुमचं Username आणि पासवर्ड टाकून सबमिट करा.
यानंतर रोल नंबर टाकून एसएससी हॉल तिकीट डाउनलोड करा. या हॉल तिकीटची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.