CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास ,  कुठे पाहता येईल निकाल?
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास , कुठे पाहता येईल निकाल?
img
Dipali Ghadwaje
सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. देशातील 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचं CBSE ने सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पासिंग पर्सेंटेज हे 0.65 टक्क्यांनी अधिक असल्याचं दिसत आहे. यावर्षी एकूण 91 टक्क्यांहून अधिक मुली पास झाल्या असून, मुलांच्या तुलनेत 6.40 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.  

कुठे पाहता येईल निकाल?

सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही आपला निकाल पाहू शकता. cbse.nic.in, cbse.gov.in, cbsereults.nic.in आणि results.cbse.nic.in या वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. तसंच काही वेळातच विद्यार्थ्यांचा निकाल हा डिजिलॉकरमध्ये देखील उपलब्ध होईल असं सीबीएसईने स्पष्ट केलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group