राज्यात सध्या दहावी- बारावीच्या परीक्षा संपून आता भरपूर दिवस झाले आहे. दरम्यान दहावी, बारावी परीक्षानंतर विद्यार्थी, पालकांकडून पुढील शिक्षणाची चर्चा आहे. मात्र, निकाल कधी लागणार? याचे पालकांना वेध लागले आहेत. दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची 21 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू झाली होती. दरम्यान दहावी, बारावी निकालासाठी विद्यार्थी, पालकांना जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही.
कारण दहावी, बारावी परीक्षांचे निकाल मे मध्येच जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यंदा बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो. तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागेल. बोर्डाकडून यंदा निकालाची डेडलाईन पाळण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झालेय. त्यामुळे वेळेत निकाल लागू शकतो.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा अधिकारी दररोज घेत आहेत.
21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच तारीख जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती दिली.