देशभरातील कॉलेजांना धक्का : आता फक्त बीएडचं शिक्षण देता येणार नाही ; NCTEने घेतला
देशभरातील कॉलेजांना धक्का : आता फक्त बीएडचं शिक्षण देता येणार नाही ; NCTEने घेतला "हा" मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने  एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता देशात फक्त बी.एड महाविद्यालयांचं संचलन बंद होणार आहे. एनसीटीईने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, देशातील एकल-चालित बी.एड महाविद्यालये आता बहु-विषयक पदवी कॉलेजेसमध्ये विलीन केली जातील. म्हणजे कोणतेही महाविद्यालय फक्त बी.एड. ची सिंगल पदवी देऊ शकणार नाही.


NCTEने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, बी.एड. ची सिंगल डिग्री देणारी कॉलेजेस म्हणजेच फक्त बी.एड. पदवीला आता बहुविद्याशाखीय अर्थात अनेक विषयांमध्ये पदवी देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विलीन व्हावे लागेल.

NCTEच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, कोणत्याही पदवी महाविद्यालयात विलीन झाल्यानंतर, बी.एड महाविद्यालये इतर विषयांचे शिक्षण देखील सुरू करू शकतात आणि ते प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 50 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात.

NCTEने जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांमुळे देशातील 15 हजारांहून अधिक बी.एड महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, प्रत्यक्षात पहायला गेलं तर प्रवेशाअभावी ही बी.एड महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

अशा परिस्थितीत,आता एनसीटीईच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फक्त बी.एड पदवी देणाऱ्या महाविद्यालयांना पदवी महाविद्यालयांच्या सहकार्याने काम करावे लागेल. यामुळे ते इतर विषयही शिकवू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढेल.

2030 पर्यंतचं टार्गेट

NCTE ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, सिंगल अर्थात फक्त बी.एड पदवी देणाऱ्या महाविद्यालयांना बहुविद्याशाखीय महाविद्यालयांमध्ये म्हणजेच पदवी महाविद्यालयांमध्ये सामील होण्यासाठी 2030 पर्यंत टार्गेट देण्यात आले आहे. ज्याअंतर्गत, यूजीसी 2030 पर्यंत अशा सर्व महाविद्यालयांना फक्त बी.एड पदवी देता येऊ शकणार नाही. त्यांना पदवी महाविद्यालयांशी जोडलं जावंच लागेल.

आता 12वी नंतर बीएड करण्याची संधी

आता देशात बी.एड प्रोग्राममधील प्रवेशाचे निकष बदलले आहेत. ज्याअंतर्गत आता विद्यार्थी बारावीनंतर बी.एड करू शकतात. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना बीए बी.एड, बी.कॉम बी.एड, बी.एससी बी.एड सारख्या पदव्या दिल्या जाणार आहेत. एकंदरीत, बी.एड.च्या अभ्यासक्रमात मोठा बदल झाला आहे. अशा परिस्थितीत, फक्त बी.एड. ची पदवी देणाऱ्या कॉलेजेसवर बंदीचे संकट घोंगावत होतं, मात्र त्यामुळेच आता एनसीटीईने बी.एड.ची प्रणाली बदलण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे बीएडची कॉलेजेस आता डिग्री कॉलेजेसह इतर कोर्सेसही सुरू करू शकतात आणि विद्यार्थ्यांना चार वर्षांची बी.एड पदवी सहज मिळू शकेल.

 

इतर बातम्या
Join Whatsapp Group