बारावी बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार ; दुपारी एक वाजता 'इथे' पाहता येईल निकाल
बारावी बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार ; दुपारी एक वाजता 'इथे' पाहता येईल निकाल
img
Dipali Ghadwaje
पुणे : गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे बारावीच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान या परीक्षा पार पडल्या. विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून परीक्षेच्या निकाल्याच्या प्रतिक्षेत होते. शेवटी आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलीये. 

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल आज (21 मे 2024) जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्यात येईल. 

यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून  फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती.  

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र  परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवारी 21 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. 

कुठे पाहता येणार निकाल?     
            
  • mahresult.nic.in
  • http://hscresult.mkcl.org
  • www.mahahsscboard.in
  • https://results.digilocker.gov.in
  • http://results.targetpublications.org

इतर बातम्या
Join Whatsapp Group