महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्त दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. अशात आज निकालाची तारीख जाहीर झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी दहावी आणि बारावीचा निकाल लागणार अशी माहिती होती. त्यावर २१ मे रोजी १२ वीचा निकाल जाहीर झाला. तसेच आता २७ मे २०२४ रोजी १०वीचा निकाल जाहीर होणार आहे.
निकालाची तारीख समजल्यानंतर निकाल ऑनलाईन लागणार आहे तर तो कसा पाहायचा? कुठे पाहायचा? निकाल पाहण्याची लिंक काय? जाणून घेऊ.
निकाल पाहण्यासाठी आधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेच्या https://mahahsscboard.in/mr या संकेत स्थळावर भेट द्या. याला पर्याय म्हणून तुम्ही https://mahresult.nic.in/ येथे देखील तुमचा निकाला पाहू शकता. तसेच msbshse.co.in या साईटवरही स्वत:चा निकाल पाहू शकता.
असा पाहा निकाल
सर्वात आधी वर दिलेल्या अधिकृत साईटवर क्लिक करा त्यानंतर यामध्ये होम पर्यायात तुम्हाला SSC वर सिलेक्ट करावं लागेल. पुढे तुमचा सीट नंबर दिलेल्या कॉलममध्ये लिहा. पुढे आईच्या नावाचा कॉलम असेल. तेथे आईचे नाव टाका. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.