मोठी बातमी ! शेतकऱ्यांना मिळणार दिलासा; पीक नुकसानीसाठी २,२१५ कोटींची मदत जाहीर
मोठी बातमी ! शेतकऱ्यांना मिळणार दिलासा; पीक नुकसानीसाठी २,२१५ कोटींची मदत जाहीर
img
दैनिक भ्रमर
एक मोठी बातमी समोर आली आहे. पीक नुकसानीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या  अतिवृष्टीने ७० लाख एकरवरील पीक हातचं गेलं आहे. तर अनेक गावात पूरस्थिती आहे. पीक नुकसानीसाठी मदत म्हणून ३१.६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. मदत व पूनर्वसन विभागाने याविषयीचा शासन निर्णय जाहीर केला. खरीप २०२५ साठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे.

मे महिन्यापासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला होता. पहिल्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी सरकारने ही मदत जाहीर केली आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे. 

शेत पीक नुकसानीसाठी मदत म्हणून राज्यातील ३१.६४ लाख शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रूपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर कऱण्यात आला आहे. खरीप २०२५ मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार, मदत जाहीर कऱण्यात आली आहे. हिंगोली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर अन् नाशिकचा समावेश आहे.

नाशिक - बाधित शेतकऱ्यांची संख्या ७ हजार १०८, या शेतकऱ्यांसाठी ३.८२ कोटी रुपयांची मदत मंजूर. 

धुळे -  बाधित शेतकऱ्यांची संख्या ७२ आहे, या शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांची मदत मंजूर. 

नंदुरबार - बाधित शेतकऱ्यांची संख्या २५ आहे, या बाधीत झालेल्या शेतकऱ्यांसाठी १ लाख रुपयांची मदत मंजूर. 

जळगाव - बाधित शेतकऱ्यांची संख्या १७ हजार ३३२ आहे. या  शेतकऱ्यांसाठी ९.८६ कोटी रुपयांची मदत

हिंगोली -  बाधित शेतकऱ्यांची संख्या - ३.०४ लाख , बाधित क्षेत्र - हेक्टर २.७१ लाख,  शेतकऱ्यांना २३१.१८ कोटी रुपयांची मदत

बीड - बाधित शेतकऱ्यांची संख्या - १.१४ लाख ; ५६.७४ कोटी रुपये बीड जिल्ह्यासाठी मंजूर

धाराशिव - जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत जाहीर; बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या २.३४ लाख ;  शेतकऱ्यांसाठी १८९.६१ कोटी रुपयांची मदत

इतर बातम्या
Join Whatsapp Group