मोबाईल अॅपवरून रिक्षा सेवा देणारी ‘उबर’ कंपनीने ग्राहकांच्या फायद्याचा निर्णय घेतलाय. कंपनीने प्रवास भाड्याबाबत नवीन नियम लागू केलाय.
नव्या नियमांनुसार प्रवाशांकडून आता मीटरप्रमाणेच भाडे आकारले जाणार आहे. उबर कंपनीने 18 फेब्रुवारीपासून चालकांशी असलेल्या करारात बदल केलाय.
नव्या अटींनुसार उबर दर ठरवत नाही. हे दर प्रवासी आणि चालकांमध्येच भाड्याचा निर्णय घेतला जातो.
यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेले मीटर दर लागू केले जातील. सध्या 17 रुपये प्रति किलोमीटर इतका अधिकृत दर आकरला जातो. याच दरानुसार प्रवाशांकडून भाडे आकारले जाईल.
त्यामुळे प्रवास सुरू करण्यापूर्वीच रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे भाडे आकारले जाणार असल्याची स्पष्ट माहिती प्रवाशांना देणे आवश्यक असणार आहे.
ही अट आरटीओने स्पष्टपणे अधोरेखित केली आहे आणि जर चालकांनी अधिक भाडे आकारले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील देण्यात आलाय.
या नवीन प्रणालीमुळे काही प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. मात्र, काही प्रवाशांनी दरात येणाऱ्या चढउतारांमुळे नाराजी व्यक्त केलीय.