हिंगोली : हिंगोलीत हातगाड्यावर फळांची विक्री करणाऱ्या एका फळ विक्रेत्याने रस्त्यात थांबून कॅरीबॅगमध्ये लघुशंका करत विकृतीचं दर्शन घडवलं होतं. या फळविक्रेत्याचा एका सुज्ञ नागरिकाने व्हिडिओ काढत सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
त्यानंतर हिंगोली शहरात नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. एका वृत्त संस्थेने याबाबत या सगळ्या प्रकाराची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आता हिंगोली शहर पोलिसांनी मंगळवार बाजार परिसरात रस्त्यावर लघुशंका करणाऱ्या या फळ विक्रेत्याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हिंगोली पोलीस या फळ विक्रेत्याची कसून चौकशी देखील करत आहेत. त्याने रस्त्यावर कॅरीबॅगमध्ये लघुशंका का केली? त्याचा हेतू काय होता? याचा देखील तपास पोलीस आता करत आहेत.