सोलापूरातील बार्शी गावात एक धक्कादायक घटना घडलीय. एकाच गावातील युवक आणि अल्पवयीन युवतीने आत्महत्या केलीय. दोघांनी कोणत्या कारणाने जीवन यात्रा संपवलीय त्याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. परंतु दोघांच्या आत्महत्येमुळे बार्शी गावात मोठी खळबळ माजलीय.
मिळालेल्या माहितीनुसार , बार्शी तालुक्यातील पांढरी गावात राहणाऱ्या एका मुलाने आणि युवतीने आत्महत्या केलीय. आत्महत्या करणाऱ्या मुलाचं वय २० वर्ष असून त्याचे नाव समर्थ उर्फ बाळू दत्तात्रय लोंढे असे आहे, तर मुलीचं वय १७ वर्ष आहे. समर्थ लोंढे यांने एका शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर अल्पवयी मुलीने राहत्या घरी लोखंडी पाईपला गळफास घेत आयुष्य संपवलं. एकाच दिवशी दोघांनी आत्महत्या केल्यामुळे बार्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ उर्फ बाळू दत्तात्रय लोंढे याने गावातील एका शेतातील झाडाला गळफास घेतला. तर तेथून काही अंतरावर असलेल्या घरात लोखंडी पाईपाला गळफास लावून मुलीने आत्महत्या केली. या दोघांनी टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.
एकाच गावात युवक आणि युवतीने आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडालीय. या घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना पाचरण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आणि पंचनामा केला. पोलिसांनी या दोन्ही घटनांची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आलीय. पोलीस या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.