शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ,  यापुढे कर्जमाफीत रकमेची मर्यादा नाही
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी , यापुढे कर्जमाफीत रकमेची मर्यादा नाही
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील शेतकऱ्यांसाठी  दिलासादायक बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार आहे. 'यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कुठलीही मर्यादा ठेवली जाणार नाही', अशी महत्वाची माहिती समोर आली आहे. पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये दीड ते दोन लाखांपर्यंतची मर्यादा असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते. मात्र, आता या नवीन निर्णयामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आता कर्जमाफीच्या योजनेत शेतकऱ्यांना रकमेची मर्यादा नाही तर सातबाराच कोरा होणार आहे. राज्यातील सुमारे २५ लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा  शकतो. या सर्व पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेली समिती एप्रिल महिन्यामध्ये आपला अहवाल सादर करेल. त्याचसोबत, सरकारनं ३० जूनपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं आहे.

राज्यचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, 'राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणारआहे. सहकार खात्यामार्फत जिल्हानिहाय माहिती मागवण्यात आली आहे. प्रविणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली आहे. ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सरकारला सादर करेल. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकार ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group