एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं, 'तो' एक निर्णय अन पदाधिकाऱ्यांकडून सामुहिक राजीनामे
एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं, 'तो' एक निर्णय अन पदाधिकाऱ्यांकडून सामुहिक राजीनामे
img
वैष्णवी सांगळे
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसलाय. तब्बल ५५ शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला असून  या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले 20 हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 



राजीनामा देण्याचे कारण काय ? 
शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांची नियुक्ती होताच शिवसेना शिंदे गटात फूट पडल्याचं पहायला मिळत आहे. जयवंत जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामा दिला आहे. जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल ५५ शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिला आहे.  

२० हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार 
एवढंच नाही तर  या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले २० हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे सर्व वीस हजार सभासद आपले राजीनामे पोस्टाने पक्षश्रेष्ठींना पाठवणार असल्याची माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.  हा निर्णय शिवसेना शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या सामूहिक राजीनाम्यामुळे करमाळा शहरातील शिवसेना शिंदे गटाची ताकद कमी होण्याची चिन्ह आहेत. 

 बागल गटाला डावलले जात असल्याची भावना 
माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नियुक्तीमुळे बागल यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून, आगामी निवडणुकीत बागल गटाला डावलले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे, याच नाराजीतून हे सामूहिक राजीनामा नाट्य घडले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या राजीमान्यांमुळे एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group