उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! यमुनोत्री धाममध्ये रस्ते खचले ; महाराष्ट्रातील 'इतके' भाविक अकडले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! यमुनोत्री धाममध्ये रस्ते खचले ; महाराष्ट्रातील 'इतके' भाविक अकडले
img
Dipali Ghadwaje
उत्तराखंडमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे यमुनोत्री धामसह अनेक भागांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते तुटले आहेत, नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

उत्तराखंडमध्ये गेलेले देशभरातली ६०० भाविक यमुनोत्री धाम अडकले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रवाशांचाही समावेश आहे. उत्तरखंडमध्ये सध्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. यमुनोत्री धाममध्ये हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील २०० प्रवाशी अडकले -

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे यमुनोत्री धाममध्ये नद्यांना पूर आलाय. रस्ते खचले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावरील छोटे पूल तुटले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटक, भाविक अडकले आहेत. यमुनोत्री धाममध्ये महाराष्ट्रातील २०० प्रवाशी अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये मुंबईमधील ५० प्रवाशांचा समावेश आहे. पर्यटकांचे व्हिडिओ समोर आले आहेत. महाराष्ट्र सरकारकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे यमुनोत्रीला रेड अलर्ट जारी केला आहे.

यमुनोत्री धाममध्ये ६०० लोक अडकले

यमुनोत्री धाममध्ये मुसळधार पावसानंतर रस्ते खचले आहेत. त्यामुळे यमुनोत्री धामवरून परतणाऱ्या ६०० हून अधिक लोकांना यमुनोत्री धाममध्येच थांबवण्यात आले आहे. सध्या ६०० पेक्षा जास्त लोक तिथे अडकले आहेत, आणि स्थानिक प्रशासनाने त्यांना थांबवले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील २०० पेक्षा जास्त लोकांचा समावेश आहे. रस्ता खचले, पूल तुटल्याने यात्रा थांबवण्यात आली आहे.

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, यमुनोत्रीला रेड अलर्ट -

गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. आजही यमुनोत्री धामला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तरकाशीतील सिलाई बँड परिसरात ढगफुटीमुळे यमुनोत्री महामार्ग तुटला.

त्यामुळे ६०० हून अधिक यात्रेकरू यमुनोत्री धाममध्ये अडकले आहेत. रस्ते बंद झाल्याने प्रशासनाने यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. स्थानिक प्रशासनाने यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी थांबवले आहे. यमुना आणि गंगा नद्यांचे जलस्तर वाढल्याने पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. देहरादून, नैनीताल, हरिद्वार, टिहरी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, चंपावत आणि उधमसिंग नगरसह अनेक जिल्ह्यांत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. शेती, रस्ते आणि घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group