राज्यात 'याठिकाणी' मुसळधार; कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट
राज्यात 'याठिकाणी' मुसळधार; कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट
img
दैनिक भ्रमर
सध्या राज्यात विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. तर काही ठिकाणी ऊन सावलीचा खेळ सुरूच आहे. राज्यात १६ जुलैपासून सतत पावसाळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, दररोज ढगाळ आकाश आणि हलका ते मध्यम पाऊस पडेल.राज्यात मागील आठवड्यात पावसाने काही ठिकाणी विश्रांती घेतली असली तरी या आठवड्याच्या सुरुवातीला पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सोमवार पासून सुरु झालेल्या पावसाने मंगळवारीसुद्धा जोरदार बॅटिंग केली. मुंबईसह उपनगरात, पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर मंगळवारी पावसाने हजेरी लावली.

ऑरेंज अलर्ट
आज मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसह रत्नागिरी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

यलो अलर्ट
पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्गाला पावसाचा जरी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये शाळा आणी कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.

हवामान खात्याने नाशिक, धुळे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या काही भागात मुसळधार पावसाची नोंद केली आहे. शहरात आणखी पाऊस पडण्याची शक्यता असून बुधवारी ढगाळ आकाश आणि हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

१६ आणि १७ जुलै रोजी शहरात उष्ण आणि किंचित दमट हवामान असेल तर तापमान २६ ते ३२ अंश सेल्सिअस दरम्यान असेल. १८ जुलै रोजीही अशीच परिस्थिती राहील, परंतु आर्द्रतेची पातळी थोडी वाढू शकते. १९ आणि २० जुलैपर्यंत, सतत पाऊस पडून ढगाळ वातावरण थंड आणि ओलसर वातावरण निर्माण करेल अशी शक्यता आहे. या काळात तापमान २५ ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, ज्यामुळे आर्द्रतेपासून काही प्रमाणात आराम मिळेल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group