राज्यातील हवामानात अचानक कमालीचे बदल झाले असून उकाड्याने तापलेल्या राज्याला आटण अवकाळीने झोडपले आहे. दरम्यान मी महिन्यात तर राज्यात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सोमवारी म्हणजे आज राज्यातील बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. तर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी देखील बरसल्या. दरम्यान पुढील 72 तास राज्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत.
पुढील तीन दिवस राज्यामध्ये पावसाचे धुमशान असेच पाहायला मिळणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना 13 मे रोजीसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यावर पावसाचे सावट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पाहुयात 13 मे रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल.
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे तर कोकण विभागातील पालघर वगळता सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सातारा या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो.
मराठवाड्यातील ही काही जिल्ह्यांना हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाड्यामध्ये लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर लातूर आणि संभाजीनगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
तर उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. अहिल्यानगरला पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर नाशिकला पावसासाठी येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भातही वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.