नोव्हेंबर महिन्यातही पावसाचे सावट, आणखी किती दिवस मुक्काम ?
नोव्हेंबर महिन्यातही पावसाचे सावट, आणखी किती दिवस मुक्काम ?
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला पाऊस नोव्हेंबर मध्ये विश्रांती घेईल अशी अपेकशा होती मात्र नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच पावसाची सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने आजही पावासाचा मोठा इशारा दिला असून पुढील काही तास अत्यंत महत्वाचे आहेत. रविवारी राज्यातील अनेक भागांना पावसाने झोडपून काढले असून आज सोमवारच्या दिवशीही बराच पाऊस कोसळू शकतो असा अलर्ट देण्यात आला आहे. 



राज्यातील बहुतांश भागात परतीच्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी काही भागात मात्र अद्यापही पावसाचे सावट आहे. अशात पावसासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. यंदा नोव्हेंबर महिना देखील पावसाचाच असल्याची माहिती समोर आली आहे. तर राज्यात नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागकडून वर्तविण्यात आली आहे.

जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलीये. तर, नांदेड शहर आणि परिररात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. परभणी शहरासह विविध भागालाही जोरदार पावसाचा तडाखा बसला असून, भिवंडी, नवी मुंबई, मुंबईसुद्धा या पावसाला अपवाद ठरलेले नाहीत. पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार असून, मेघगर्जनेच्या साथीनं पावसाच्या हजेरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 तर, दक्षिण कोकण आणि गोव्यामध्येसुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं अवकाळीच्या तयारीनिशीच घराबाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. समुद्र अद्यापही खवळलेलाच असल्या कारणानं मासेमारांना खोल समुद्रात, भरतीच्या वेळीसुद्धा न जाण्याचा इशारा दिला आहे. पर्यटनासाठी समुद्रकिनारी भागांमध्ये जाणाऱ्या पर्यटकांनासुद्धा हाच इशारा लागू आहे. 

राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज. अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसाचा काळ वाढला आहे. 7 नोव्हेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group